News Flash

… तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढणार; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

लॉकडाउनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाउन कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. लॉकडाउनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन कायम राहील असे त्यांनी सांगितले.

“हा लॉकडाउन कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ते तुमच्या हातामध्ये आहे. शिस्त तुम्ही पाळली पाहिजे. आपल्याला करोना व्हायरसची साखळी तोडायची आहे. तरच आपण यातून लवकर बाहेर पडू. आपण हा साखळदंड तोडूच” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहील हे सांगताना त्यांनी किमान या शब्दावर विशेष भर दिला. भाजीमंडई किंवा अन्य कुठेही तुम्ही गर्दी केली नाही तरच ३० एप्रिलनंतर लॉकडाउनमधून बाहेर पडता येईल असे त्यांनी सांगितले. किमान शब्द वापरताना त्यांनी नागरिकांना शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. करोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर कदाचित ३० एप्रिलनंतरही लॉकडाउन कायम राहू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 5:23 pm

Web Title: coronavirus crisis lockdown could extende after 30 april also uddhav thackeray gave hints dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
2 रेशनवरील धान्याचा काळाबाजार; दुकानदारावर गुन्हा दाखल
3 काळाबाजार..! बीडमध्ये पेट्रोल १५० रुपये लिटर, तेही रॉकेल मिश्रीत
Just Now!
X