29 September 2020

News Flash

टाळया किंवा थाळया वाजवून करोना विषाणू जाणार नाही – उद्धव ठाकरे

आंतर जिल्हा सीमा बंद करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

संग्रहित

जनता कर्फ्यूला राज्यातील जनतेने रविवारी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी आभार मानतो. पण टाळया किंवा थाळया वाजवून हा करोना विषाणू जाणार नाही. टाळया, थाळया वाजवणं ही पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस हे आपल्या जीवाची बाजी लावून लढतातयत त्यांच्याप्रती ती कृतज्ञतेची भावना होती असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. हे आपण ओळखलं पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. औषध बनवणाऱ्या कंपन्या, बेकरी, पशू खाद्य, कृषी विषयक बियाण विक्री सुरु राहील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा- महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

आंतर जिल्हा सीमा बंद करत असल्याचे उद्धव यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा विषाणू पोहोचलेला नाही, तिथे आपल्याला त्याला पोहोचू द्यायच नाहीय आणि जिथे पोहोचला आहे तिथे त्याला संपवायच आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 5:15 pm

Web Title: coronavirus crisis maharashtra cm uddhav thackeray announce close district borders dmp 82
Next Stories
1 महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
2 लॉकडाऊननंतरही लोक रस्त्यावर कसे?; हायकोर्टाचा सरकारला सवाल
3 केंद्राकडून थाळी आणि टाळी शिवाय मदत नाही; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Just Now!
X