03 June 2020

News Flash

करोनाच्या भीतीने गावी निघालेल्या कुटुंबाचा अपघात, आई-वडिलांसह सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

करोनाच्या भीतीने सध्या अनेक लोक, कामगार आपल्या गावी परतण्यासाठी निघाले आहेत

करोनाच्या भीतीने सध्या अनेक लोक, कामगार आपल्या गावी परतण्यासाठी निघाले आहेत. यासाठी अनेकजण धोका पत्करत, जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. दरम्यान अशाच पद्धतीने गावी निघालेल्या कुटुंबाचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साताऱ्यातील कराडमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातात पती पत्नीसह सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब पुण्यात वास्तव्यास होतं. तेथून ते आपल्या मूळ गावी शाहुवाडी तालुक्यातील जांभोर येथे निघाले होते. दुचाकीवरुन त्यांनी आपला प्रवास सुरु केला होता. कराडमध्ये दुचाकी दुभाजकावर आदळल्याने त्यांचा अपघात झाला. यानंतर त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही घटना २५ तारखेची आहे. रुग्णालयात दाखल केलं तेव्हाच पती आणि मुलाला मृत घोषित केलं. तर पत्नीचा आज मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर त्यांच्या गावात हळहळ व्यक्त केली जात असून शोकाकुल वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 7:45 pm

Web Title: coronavirus family killed in accident in satara sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाच्या चिंतेतून दिलासा देणारी बातमी, यवतमाळ करोनामुक्त
2 सलाम! गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट, मराठमोळ्या महिलेची यशोगाथा
3 हे रक्तदान म्हणजे लोकांनी लोकांसाठी योजलेलं महायज्ञ : आदेश बांदेकर
Just Now!
X