27 September 2020

News Flash

विदर्भात करोनाग्रस्ताचा पहिला बळी, संपर्कात आलेल्यांचीही आता तपासणी करणार

बुलढाण्यात मृत्यू झालेल्या ‘त्या’ रुग्णाचा करोना अहवाल सकारात्मक

संग्रहित छायाचित्र

अकोला : बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात शनिवारी मृत्यू झालेल्या ‘त्या’ रुग्णाचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे करोनाग्रस्ताच्या मृत्यूची पहिली नोंद विदर्भात झाली. या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

बुलढाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ४५ वर्षीय रुग्णावर उपचार सुरू होते. त्यांना निमोनिया झाला होता. सोबतच त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्यात करोनाचे प्राथमिक लक्षणे दिसून आले होते. निमोनिया अधिकच वाढत गेल्याने त्यांची प्रकृती ढासळली. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर तासभरातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्या रुग्णाचे स्वॅब नमुने तातडीने नागपूर येथे विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाला. तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने त्या रुग्णाला करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या मृत व्यक्तीची विदेश प्रवासाची पाश्र्वाभूमी नव्हती. मात्र, तो रुग्ण एखाद्याा करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीवर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळीही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्या रुग्णाचे नातेवाईक, शेजारी, अगोदर दाखल करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी, असे अनेक जण त्या रुग्णाच्या संपर्कात आले होते. संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दोन संशयितांचे अहवाल नकारात्मक
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात शनिवारी तीन संशयितांना दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले असून, त्यामध्ये मृत व्यक्तीचा सकारात्मक, तर इतर दोन संशयितांना अहवाल नकारात्मक आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 5:10 pm

Web Title: coronavirus first death in vidarbha buldhana district pkd 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 शेकडो वर्षांची वारकरी परंपरा करोनामुळे खंडीत; पंढरीची चैत्र वारी रद्द
2 “घरी असाल, तरी सुट्टी नाही; लोकांपर्यंत मदत पोहोचवा”; भाजपा कार्यकर्त्यांना फडणवीसांच्या सूचना
3 CoronaVirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले १५ महत्त्वाचे मुद्दे…
Just Now!
X