News Flash

Coronavirus : सोलापुरात चार नवे रूग्ण, एकूण संख्या 37 वर

चार दिवसांत घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.  सोलापुरात आज करोनाची बाधा झालेले चार नवे रूग्ण आढळून आले.  मागील अकरा दिवसांत रूग्णांची एकूण संख्या 37 पोहचली आहे. यामध्ये तीन मृतांचा समावेश आहे.

दरम्यान, आज (गुरूवार)दुपारी नवे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोलापुरात येऊन करोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यात कठोर उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने शहरात संचारबंदी आणखी चार दिवस काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याची भरणे यांनी माहिती दिली. 20एप्रिलपासून शहरात संपूर्ण संचारबंदीचा कडक अंमल आहे. जीवनाश्यक वस्तू सेवांपैकी केवळ दुधाचा (सकाळी 6 ते 9) अपवाद वगळता अन्य सर्व सेवा बंदच आहेत.

याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या चार दिवसांत घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 4:00 pm

Web Title: coronavirus four new patients were found in solapurtotal patients number to 37 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 हिंदू पुजाऱ्यांच्या मदतीसाठी धावले MIM चे एम्तियाज जलील
2 उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी आघाडीतील नेत्यांचं प्लॅनिंग; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
3 ‘We Fight Corona’ या उपक्रमात सहभागी व्हा… तुमचा व्हिडिओ पाठवा
Just Now!
X