27 February 2021

News Flash

Coronavirus: ‘तो’ मेसेज पूर्णपणे खोटा, आरोग्य विभागाकडून मोठा खुलासा

एक अफवा समाजमाध्यमांवर पसरली असून आरोग्य विभागाने त्यावर खुलासा केला आहे

एकीकडे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत असताना दुसरीकडे अफवांचं पीक उठलं आहे. अशीच एक अफवा समाजमाध्यमांवर पसरली असून आरोग्य विभागाने त्यावर खुलासा केला आहे. करोनाची लागणी झाली आहे की नाही यासाठी रक्त तपासणी होत असून, महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत आहे, आरोग्य विभागाने यावर खुलासा करत हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे.

खुलासा करताना काय म्हटलं आहे ?
राज्यात संशयित रुग्णांची करोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाच्या घशाचा द्रव घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या तीन ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या रुग्णांचे नमुने पाठवले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढवण्यात येणार आहे.

आणखी वाचा- करोनाची लक्षणं आढळलेल्यांचीच चाचणी होणार – आरोग्यमंत्री

आणखी वाचा- Coronavirus: ‘त्या’ एका टॅक्सीमुळे मुंबईत पाच जणांना लागण आणि एकाचा मृत्यू

सोशल मीडियावर सध्या करोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत आहे. करोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 1:05 pm

Web Title: coronavirus health department on fake message of blood test in hospitals sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: एमपीएससीची पूर्वपरीक्षा नियोजित वेळेनुसारच; आयोगाचं स्पष्टीकरण
2 बीड: भरधाव वेगातील कार ट्रान्सफॉर्मरला धडकली, चौघांचा मृत्यू
3 कोरेगाव भीमा हिंसाचार: शरद पवारांना समन्स, ४ एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश
Just Now!
X