करोनामुळे भारतासह जगावर अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. महाराष्ट्रातही करोनाचा संसर्ग पहिल्या दोन आठवड्यात वेगानं पसरला. मात्र, सरकारनं वेळीच कठोर पावलं उचलल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांचा उदरर्निवाहाची साधनं ठप्प झाली आहेत. त्यांच्या जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात असून, मदतीसाठी आवाहन केलं जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही खारीचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला राज्य सरकार तोंड देत आहे. सध्या लॉकडाउन असून, सगळ्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करता यावी, म्हणून सरकारनं मदतीचं आवाहन केलं होतं. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं पुढे येत योगदान दिलं.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”

सोनाली कुलकर्णीनं मुख्यमंत्री सहायता निधीत मदत केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करून सांगितलं. त्यानंतर सोनालीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी देवाचे आणि माझ्या आई-बाबाचे आभार मानते की ह्या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. चार पैसे, माणसं आहेत. ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. ती किती आहे यावर चर्चा होवू नये म्हणून सांगत नाही. कमी- जास्त, जे काही असेल, या लढ्यात माझा खारीचा वाटा आहे. गरजूंपर्यंत ही पोहचावी आणि त्याचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा,’ असं सोनालीनं म्हटलं आहे.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक उद्योगपतींनी सरकारला मदत केली आहे. त्याचबरोबर सिनेसृष्टीही मदतीसाठी धावून आली आहे. बॉलिवूडबरोबरच मराठी कलाकारही आता आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत.