करोना व्हायरस बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. हा ग्राफ आटोक्यात आणावा लागेल. कम्युनिटी ट्रान्समिशन होत असेल तर आपल्यासाठी ती धोक्याची घंटा आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.

“पाश्चिमात्य देशांच्या मनाने आपल्याकडे करोना बाधितांची संख्या कमी असली तरी धोका खूप मोठा आहे. कारण आपल्याला लोकसंख्येची कल्पना आहे. आरोग्य, स्वच्छतेची परिस्थिती सर्वानाच माहित आहे” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “साक्षरतेची परिस्थिती काय आहे हे आपण पाहतोय, माहितीच्या आधारावर करोना विरोधातील हे युद्ध आपल्याला जिंकाव लागेल. तबलिगीच्या कार्यक्रमाला कोणी परवानगी दिली, यात मला पडायचं नाही पण त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे” हे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आणखी वाचा- खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी काय घोडं मारलं आहे त्यांचा विमा का नाही ? पृथ्वीराज चव्हाण

“नांदेडच्या गुरुद्वारामध्ये दोन ते चार हजार लोक अडकले आहेत. एकाला करोनाची लागण झाली की, ती वेगाने पसरणार. हा बायलॉजिकल टाइमबॉम्ब आहे. गेल्या १०० वर्षात अशी साथ पसरली नव्हती” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.