कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमावर रद्द करण्यात आली आहे. चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर मंगळवारी सुनासुना झाला होता. चैत्र यात्रेचा आज मुख्यदिवस असल्याने लाखो भक्तांचे आराध्यदैवत श्री जोतिबा देवांची दरबारी अलंकारिक महापूजा बांधली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी महाराष्ट्र,  कर्नाटक,  गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश यासह अन्य काही राज्यातील भाविक चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेसाठी या ठिकाणी येत असल्याने वाडी रत्नागिरीचा डोंगर भाविकांच्या गर्दीत हरवून जात असतो. सहा लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. या अगोदर १८९९ मध्ये प्रथमच जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती. तेव्हा प्लेगची साथ असल्याने यात्रा बंदचा आदेश देण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus jotiba yatra canceled msr
First published on: 07-04-2020 at 10:18 IST