राज्यात दिवसभरात २३४७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ०५३ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात ६३ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ११९८ वर पोहोचली आहे. राज्यात आज नवीन ६०० रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ७६८८ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात एकूण २४ हजार १६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात नऊ, औरंगाबाद शहरात सहा, सोलापूर शहरामध्ये तीन, रायगडमध्ये तीन, ठाणे जिल्ह्यात एक, पनवेल शहरात एक, लातूर मध्ये एक, आणि अमरावती शहरात एक झाला आहे.

महत्त्वाचं म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या करोनाबाधित रुग्णांना घरी सोडलं जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून झाली तीन अंकी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार १५० झाली आहे.