News Flash

Coronavirus – … अखेर औरंगाबादमध्ये लॉकडाउन घोषित

३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. प्रमुख शहरांमध्ये तर दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रूग्णांचे मृत्यू देखील वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाला असलेल्या अधिकारांचा वापर करून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. दरम्यान, आज (शनिवार) औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

लॉकडआउन काळात किराणा दुकान, दूध-भाजी विक्री देखील दुपारी १२ पर्यंतच सुरू राहणार. त्यानंतर हे सर्व बंद राहणार आहे.

लॉकडाउन काळात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार आहे. याचबरोबर खासगी, सरकारी, सर्व वाहनांना बंदी असणार आहे. जलंतरण तलाव, जिम, हॉटेल्स, मंगलकार्यालयं, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी असणार आहे.

मुंबईत उद्यापासून नाईट कर्फ्यू ; BMC चा महत्वाचा निर्णय

शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहणार आहेत. तर, ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. याशिवाय, हॉटेलमधील आसनव्यवस्थेसह जेवणाची सूविधा (डायनिंग)बंद राहील मात्र निवासी असलेल्या यात्रेकरूना त्यांच्या खोलीमध्ये भोजनव्यवस्थेस परवानगी राहणार आहे.

दरम्यान,  येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय काल घेतला आहे.

Coronavirus – राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे  आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 8:24 pm

Web Title: coronavirus lockdown announced in aurangabad msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 तो रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला, मी पहिली दोन पानंच दिली होती – फडणवीस
2 गुन्हा दाखल झाल्यावर फडणवीस घाबरलेत?; राष्ट्रवादीचा निशाणा
3 IPS रश्मी शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली – भातखळकर
Just Now!
X