लॉकडाउनचा दुसरा टप्पा आज संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ मे रोजी सोमवारपासून तिसऱ्या टप्याची घोषणा केली. तिसऱ्या टप्प्यात केंद्राकडून अनेक उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे. ४ मेपासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली; तसेच ई-कॉमर्स कंपन्यांकरवी जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीचीही मुभा दिली जाईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले… देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने करोनावर विजय मिळवला आहे. मात्र, ही लढाइ अद्याप संपलेली नाही. देशविदेशातील तसेच मुंबई पुण्यासह राज्यातील करोनाविषयीची माहिती वाचा एका क्लिकवर….

Live Blog

22:17 (IST)03 May 2020
राज्यात दिवसभरात 27 मृत्यू, 678 नवे रुग्ण

देशाबरोबरच राज्यातही करोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. आज राज्यात करोनाने 27 जणांचा बळी घेतला असून 678 नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 12 हजार 974 वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची 548 ही संख्या समाविष्ट आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

21:44 (IST)03 May 2020
पुण्यात दिवसभरात 99 करोना बाधित रुग्ण

पुण्यात दिवसभरात 99 करोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण 1817 इतकी रुग्णांची संख्या झाली आहे. तर सात रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 101 झाली आहे. त्याच दरम्यान 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर 433 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

21:43 (IST)03 May 2020
रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १२८ वर

रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १२८ वर पोहोचला आहे. रविवारी ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात पनवेल मनपा हद्दीत ३, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३ तर उरण मधील १ रुग्णाचा समावेश आहे. १२८ पैकी १०५ रुग्ण पनवेलमधील आहेत. जिल्ह्यातील १ हजार ०३३ रुग्णांचीं स्वॅब तपासणी करण्यात आली, यातील ८२६ जणांचे रिपोर्ट नकारात्मक आले. १२८ जणांचे रिपोर्ट सकारात्मक आले. तर ७९ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील ५० जण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत. तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

20:53 (IST)03 May 2020
नवी मुंबईत एका दिवसात २५ रुग्ण वाढले

नवी मुंबईत करोनाचा कहर सुरूच एका दिवसात २५ रुग्ण वाढले ,नवी मुंबईत करोना बधितांची संख्या ३१४ झाली आहे. तसेच, आज दिवसभरात मुंबईत करोनाने 21 जणांचा बळी घेतला तर 441 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 613 वर पोहचली आहे तर आतापर्यंत 343 जणांचा मृत्यू झाला आहे. आज  दिवसभरात 1 हजार 804 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

20:39 (IST)03 May 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये सहा करोना बाधितांची भर;एकूण संख्या १२१ वर

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी सहा जण करोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून पैकी एकाला आज घरी सोडण्यात आले आहे. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १२१ वर पोहचली आहे. त्यामुळं नागरिकांनी आणखी जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. 

20:27 (IST)03 May 2020
मुंबईत आज 441 नवे करोनाबाधित, 21 जणांचा मृत्यू

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढताना दिसत आहे. राज्यात मुंबईत करोना बाधितांची सर्वाधिक संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत करोनाने 21 जणांचा बळी घेतला तर 441 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 613 वर पोहचली आहे तर आतापर्यंत 343 जणांचा मृत्यू झाला आहे. आज  दिवसभरात 1 हजार 804 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

19:41 (IST)03 May 2020
करोनामुक्त हावडा'साठी काढली रॅली; शेकडो लोक झाले सहभागी

करोनामुक्त हवाडा अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक तृणमूलच्या नेत्यांनी टिकियापरा येथे रॅली आयोजित केली. या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते.

19:41 (IST)03 May 2020
करोनामुक्त हावडा'साठी काढली रॅली; शेकडो लोक झाले सहभागी

करोनामुक्त हवाडा अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक तृणमूलच्या नेत्यांनी टिकियापरा येथे रॅली आयोजित केली. या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते.

19:38 (IST)03 May 2020
सोलापुरात आढळले करोनाबाधित १४ नवे रूग्ण

सोलापुरात आज रविवारी सायंकाळपर्यंत करोनाबाधित नवे १४ रूग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १२८ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील दोन रूग्णांचा अपवाद वगळता आढळून आलेले सर्व रूग्ण शहरातील दाट लोकवस्त्यांच्या झोपडपट्टी भागातील राहणारे आहेत. आज दिवसभरात बापूजीनगरातून चार तर रेस्ट-न्यू ति-हेगाव येथे तीन रूग्ण आढळून आले. शास्त्रीनगरात दोन रूग्ण सापडले. अद्याप १९३ रूग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. दरम्यान, एकूण रूग्णांमध्ये सहा मृतांचा समावेश आहे. तर यशस्वी उपचारानंतर करोनावर मात करणाऱ्या १९ व्यक्तींना पाठविण्यात आले आहे. सध्या १०३ रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

19:09 (IST)03 May 2020
देशात चोवीस तासांत 2 हजार 487 नवे रुग्ण, 83 मृत्यू

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे 2 हजार 487 नवे रुग्ण आढळले असून, 83 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 40 हजार 263 वर पोहचली आहे.

16:48 (IST)03 May 2020
सोलापुरात करोनाचे दहा रूग्ण वाढले. एकूण रूग्णसंख्या 124 वर

राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सोलापुरात आज करोनाचे दहा रुग्ण वाढले आहेत. याचबरोबर एकुण करोनाबाधितांची संख्या 124 वर पोहचील आहे.

16:41 (IST)03 May 2020
मुंबईत उभं राहतंय १ हजार बेडचं करोना हॉस्पिटल

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीएच्या जागेवर तब्बल 1000 बेडची क्षमता असणाऱ्या कोविड-19 रुग्णायलच्या बांधकामास सुरूवात केली आहे.

14:29 (IST)03 May 2020
एका दिवसात १०००० जण परतले रुग्णालयातून घरी

देशातील सर्व नागरिकांसाठी दिलासा आणि चिंता कमी करणारी बातमी आहे. एका दिवसात देशभरात उपचार घेत असलेले १०००० रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.

12:38 (IST)03 May 2020
उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार….

सध्या करोना व्हायरसमुळे देशात तिसरा लॉकडाउन घेण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेकजण घरापासून दूर अडकून पडल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरराज्यात गेले आणि तिथेच अडकून पडले आहेत. त्यांना राज्यात माघारी आणण्यासाठी राज्यसराकर प्रयत्न करत आहे. अशामध्येच ठाण्याती एक विद्यार्था नोकरीसाठी चेन्नईला गेला होता... वाचा सविस्तर

12:33 (IST)03 May 2020
Video : करोना योद्ध्यांना एअर फोर्सकडून अनोखी मानवंदना

करोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांना भारतीय सेनाकडून अनोख्या पद्धतीनं सलामी दिली जात आहे. रविवारी आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम झाला.

12:02 (IST)03 May 2020
अकोल्यात करोनाबधितांची संख्या ५२ वर

अकोल्यात आज आणखी १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून आकोल्यातील
आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहचली आहे

10:09 (IST)03 May 2020
मालेगावात करोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३२५

मालेगाव- मालेगावात नव्याने 27 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण करोना बाधितांची संख्या आता ३२५ झाली आहे. आज 128 अहवाल प्राप्त झाले त्यात 91 नकारात्मक आले असून 37 अहवाल सकारात्मक आहेत. या सकारात्मक अहवालांमध्ये दहा अहवाल हे जुन्या रुग्णांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे आहेत.

09:34 (IST)03 May 2020
देशातील करोनाबाधितांची संख्या ४० हजारांकडे

भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ९८० झाली आहे. त्यापैकी दहा हजार ६३३ जण ठिक झाले आहेत. सध्या २८ हजार ४६ करोनाबाधित रूग्ण आहेत. आतापर्यंत भारतात १३०१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

08:52 (IST)03 May 2020
महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण, ३६ मृत्यू, संख्या १२ हजार २०० च्याही पुढे

महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 
08:49 (IST)03 May 2020
राज्यांच्या विनंतीनुसारच विशेष रेल्वे सुरु, इतर गाड्या अद्याप बंदच - रेल्वे मंत्रालय

लॉकडाउनमुळं देशातील विविध भागात अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, या रेल्वे गाड्या केवळ संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीनुसारच सुरु करण्यात आल्याचे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. त्यामुळे नेहमीच्या इतर पॅसेंजर रेल्वे सध्या बंद असणार आहेत. सविस्तर वृत्त वाचा

08:32 (IST)03 May 2020
मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (पीएमआर) नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्याची परवानगी मिळणार नाही. या क्षेत्रात अडकलेल्या परप्रांतातील मजुरांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असा खुलासा राज्य सरकारनेच केला आहे.