लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून यानंतर सरकारची पुढील रणनीती काय असणार आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यादरम्यान सोशल मीडियावर बुधवारपासून राज्य सरकारच्या नावे काही अधिसूचना व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये सलून, दुकानं आणि सार्वजनिक ठिकाणांवर व्यायाम तसंच इतर शारिरीक हालचालींना परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तुमच्याही मोबाइलवर जर हे मेसेज आले असतील तर फॉरवर्ड करण्याआधी थांबा. कारण राज्य सरकारने अशी कोणत्याही अधिसूचना किंवा आदेश दिलेले नसून व्हायरल झालेल्या अधिसूचना खोट्या आहेत.

राज्य सरकारने व्हायरल झालेल्या अधिसूचना शेअर करत सांगितलं आहे की, “सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अधिसूचना राज्य शासनाने जारी केलेल्या नाहीत. सलून, ब्युटी पार्लर, पार्क आणि इतर सुविधा २९ मे पासून सुरु होणार नाहीत. अशा प्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत”.

व्हायरल झालेल्या अधिसूचनेत काय लिहिलं आहे –
व्हायरल झालेल्या अधिसूचनेत लॉकडाउनमुळे बंद करण्यात आलेले सलून, दुकानं २९ मे पासून सुरु कऱण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सलून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून फक्त केस कापले जावेत. तसंच ग्राहकांनी येण्याआधी वेळ घेतलेली असावी. याशिवाय संपूर्ण सलून निर्जुंतीकरण केलेलं असावं असा उल्लेख यामध्ये आहे.

तसंच व्यायाम बगिचे, मैदानं, फूटपाथ अशा सार्वजनिक ठिकाणी जॉगिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि इतर शारिरीक व्यायाम करण्यास पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत राज्य सरकारने परवानगी दिली आहे अशी खोटी माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अधिसूचना खोट्या असून त्या पुढे फॉरवर्ड करु नका,