News Flash

महाराष्ट्राने पुन्हा करुन दाखवलं, बरे झालेल्या रुग्णांची विक्रमी संख्या; ४१६१ रुग्णांना सोडले घरी

राज्यात महिन्याभरात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांची विक्रमी संख्या

संग्रहीत छायाचित्र

राज्यात  महिन्याभरात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

२९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर १५ जून रोजी ५०७१ इतके रुग्ण बरे होऊन एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आज त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

“राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे,” असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

कोणत्या विभागातून किती रुग्ण सोडण्यात आले –
बुधवारी सोडण्यात आलेल्या ४१६१ पैकी मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 7:53 pm

Web Title: coronavirus lockdown heath minister rajesh tope 4161 patients discharge today sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चंद्रकांत पाटील यांना मुश्रीफ समर्थकांकडून धन्यवाद, वादावर पडदा!
2 लॉकडाउन काळात सातारा जिल्ह्यात तब्बल सात हजार टन शेतमालाची विक्री
3 पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू ; राष्ट्रवादीचा कोल्हापुरात इशारा
Just Now!
X