22 September 2020

News Flash

“परीक्षांसाठी देशभरात एकच सूत्र हवे”, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत आम्ही नसल्याची उद्धव ठाकरेंची मोदींना माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षांसाठी देशभरात एकच सूत्र हवं अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत उद्धव ठाकरेदेखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसंच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत अशा काही मागण्याही केल्या आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
“लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत आम्ही नाही आहोत. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुण निश्चिती करण्याचा फॉर्म्युला तयार करण्याचं ठरवलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा रितीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी देखील असेल,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. “केंद्राने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 7:05 pm

Web Title: coronavirus lockdown maharashtra cm uddhav thackeray demands to pm narendra modi over exams sgy 87
Next Stories
1 ‘वन महोत्सव’ काळात सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करणार – वनमंत्री
2 अकोल्यातील करोनाबाधित रुग्णाचा यवतमाळमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले ‘हे’ मुद्दे
Just Now!
X