23 January 2021

News Flash

लॉकडाउनचं काय? लोकल रेल्वे सुरु होणार का ?….उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली

लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आल्याने पुढील निर्णय घेण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. मात्र अद्यापही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. त्यामुळे लॉकडाउन वाढवला जाणार की नियम शिथील करत सेवा सुरु केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या तसंच काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात….

१) मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी. केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
२) परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे मात्र हे करतांना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो
३) लॉकडाउनच्याबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्ये त्याप्रमाणे अंमलबजावणी करू
४) लॉकडाउनबाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी
५) करोनामुळे काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात.
६) राज्याला ३५ हजार कोटींचा फटका बसला असून जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिशापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे या संकट समयी मदत होऊ शकेल.
७) कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिक काटेकोर लक्ष देण्यात येत असून लॉकडाऊनची अधिक कठोर अंमलबजावणी. चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.
८) करोनाचा प्रतिबंध करणारे औषध बनविणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देऊन ते तयार करण्यात पुढाकार घेतल्यास उपयोग होईल.
९) वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावे. तसेच काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत त्यांना सीमा शुल्कात सवलत द्यावी.
१०) पोलिसाना विश्रांती देण्याची गरज आहे. त्यामुळे आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 9:09 pm

Web Title: coronavirus lockdown maharashtra cm uddhav thackeray pm narendra modi sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मातृदिनीच माकडीणीने पिल्लाला नाकारले
2 पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्र सरकारने मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे – उद्धव ठाकरे
3 राज्याला जीएसटीचा परतावा लवकर मिळावा, पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांची मागणी
Just Now!
X