01 December 2020

News Flash

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ७५२ वर, दिवसभरात ३७०७ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात दिवसभरात ३७०७ नव्या रुग्णांची नोंद

घशातील स्वॅब घेताना डॉक्टर. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात आज ३३०७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख १६ हजार ७५२ वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभारत ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५६५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान आज १३१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ हजार १६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ५१ हजार ९२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी एकट्या मुंबईत २६ हजार ९९७ रुग्ण आहेत.

दरम्यान धारावीत  नवे १७ रुग्ण सापडले आहेत. यासोबत धारावीतील करोनाबाधित रुग्णसंख्या २१०६ वर पोहोचली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. धारावीत आतापर्यंत ७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या २४ तासात करोनाचे १० हजार ९७४ रुग्ण आढळले असून २००३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या तीन लाख ५४ हजार ६५ वर पोहोचली आहे. तर मृत रुग्णांची संख्या ११ हजार ९०३ झाली आहे. यामध्ये १ लाख ५५ हजार २२७ अॅक्टिव्ह तसंच १ लाख ८६ हजार ९३५ बरे होऊन घऱी गेलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 9:02 pm

Web Title: coronavirus lockdown maharashtra reports 3307 new positive cases and 114 deaths sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 सातारा : वाढदिवशी कोयत्याने कापला केक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
2 Coronavirus: प्रयोगशाळेत स्वत:हून तपासणीला जाणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
3 वर्धा : भूमीपूत्र संघर्ष वाहिनीकडून चीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
Just Now!
X