25 November 2020

News Flash

मोठी बातमी! राज्यात मॉल्स सुरु करण्याची तारीख ठरली; मात्र…

राज्य सरकारचा लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय

"जागतिक आरोग्य संघटना सर्व देशासंह त्यांच्या अर्थव्यवस्था, संस्था, शाळा व व्यवसाय सुरक्षितपणे उघडण्याच्या नव्या टप्प्यात जाण्यास कटिबद्ध आहे. हे करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा यात सहभाग असणं गरजेचं आहे. स्थानिक पातळीवरील जोखीम लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समुदायानं आणि देशांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत," असंही टेड्रोस म्हणाले. ( इंडियन एक्स्प्रेस फोटो)

राज्य सरकारने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासोबतच महत्त्वाचं म्हणजे लॉकडाउन जाहीर झाल्यापासूनच बंद असलेले मॉल्स सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सना ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ज्यासाठी मॉल्स ओळखले जातात आणि ज्यामुळे तिथे सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता असले अशा थिएटर आणि फूड कोर्टच्या सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ बंद राहणार आहेत. पण होम डिलिव्हरी करण्यासाटी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सोबतच आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही.

दरम्यान दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 10:12 pm

Web Title: coronavirus lockdown malls and market complexes will be opearion from 5th august in maharashtra sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून
2 राज्यात वाहतुकीचे नवे नियम; दुचाकीस्वारांना मोठा दिलासा, तर चारचाकी वाहनधारकांना…
3 रायगड जिल्ह्यात करोनाचे ३९८ नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
Just Now!
X