News Flash

चेहरा लपवून बच्चू कडूंचा कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न, पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन करायला गेले आणि….

बच्चू कडू यांनी पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केलं

करोनामुळे राज्यातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असून नियंत्रण मिळवण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मतारी दिवस-रात्र करोना रुग्णांवर उपचार करत असून दुसरीकडे रस्त्यांवर पोलीसदेखील लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत आहेत. पोलीस आपलं काम व्यवस्थित करत आहेत की नाही हे तपासण्यासाठी राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू स्वत: रस्त्यावर उतरले होते. बच्चू कडू यांनी पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्टिंग ऑपरेशनच केलं.

बच्चू कडू यांनी बैदपुरा भागातील कंटेनमेंट झोनमध्ये आपली ओळख लपवून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. फाटे चौक येथे बच्चू कडू यांनी आपला चेहरा पोलिसांना दिसू नये यासाठी कापड गुंडाळलं होतं. दुचाकीवर मागच्या सीटवर ते बसले होते. पोलिसांनी ओळखू नये यासाठी त्यांनी स्वत:देखील पोलिसांशी बोलणं टाळलं. त्यांच्यासोबत असणारी व्यक्ती आपल्याला आत सोडा म्हणून पोलिसांकडे विनंती करत होती.

मात्र पोलिसांनी त्यांना आत सोडलं नाही. याउलट कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न कर असल्याने सुनावलं. त्यामुळे बच्चू कडू यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना कंटेनमेंट झोनमध्ये अतिशय कठोरपणे नियमांची अमजबजावणी केली जावी अशा सूचना दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 5:22 pm

Web Title: coronavirus lockdown prahar janshakti bachchu kadu sting operation in akola sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मी शपथ घेतो की…अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषदेवर बिनविरोध निवड
2 श्रमिकांनी धोकादायक प्रवासाऐवजी एसटीतून सुरक्षित प्रवास करा; अनिल परब यांचे आवाहन
3 महाराष्ट्र-उत्तर प्रदेशातील रूग्णालंय टाटा ट्रस्ट करणार विकसित
Just Now!
X