News Flash

धक्कादायक! मिरजमध्ये लॉकडाउनमध्ये अडकलेल्या तरुणीला दारु पाजून सामूहिक बलात्कार

लॉकडाउन असल्याने तरुणी मिरजमध्येच अडकली होती

प्रतिनिधिक छायाचित्र

सांगलीमधील मिरज येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउन असल्यने तरुणी मिरजमध्येच अडकली होती. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील ही तरुणी मिरजेत मैत्रिणीकडे आली होती. लॉकडाउन असल्याने पुन्हा घरी जाणं तिला शक्य नव्हतं. पीडित तरुणी व तिची मैत्रीण रात्री घराबाहेर गप्पा मारत बसल्या होत्या. काही वेळाने मैत्रीण निघून  गेली. पीडित तरुणी एकटी असल्याचं पाहून आरोपी अक्षय राजू कनशेट्टी (२१) आणि राजू बाबू अचूदन (३०) या दोघांनीही फायदा घेतला. आरोपींनी पीडीत तरुणीला बळजबरीने दुचाकीवर बसवून गजानन मेडिकल शेजारी निर्जनस्थळी नेले. तिथे पीडित तरुणीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. याबाबत पीडित तरुणीने गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून अत्याचार केलेल्या नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 12:45 pm

Web Title: coronavirus lockdown rape on girl in miraj sangli sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
2 लॉकडाउनमुळे बंगळुरूत अडकलेल्या मिथुन चक्रवर्ती यांना पितृशोक
3 Coronavirus Updates: महाराष्ट्रात आज ५१ रुग्णांना डिस्चार्ज
Just Now!
X