News Flash

धक्कादायक! पंजाबला यात्रेकरूंना सोडून परतलेले नांदेडचे तीन ट्रॅव्हल्स चालक करोनाबाधित

पंजाबला यात्रेकरूंना सोडून परतलेल्या ट्रॅव्हल्सच्या तीन चालकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे

(Photo: PTI)

पंजाबला यात्रेकरूंना सोडून परतलेल्या ट्रॅव्हल्सच्या तीन चालकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पाठवलेल्या संशयितांच्या नमुन्यांपैकी तिघांचे करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. नवीन तिन्ही रुग्ण पंजाब येथे यात्रेकरूंना सोडून परतलेले नांदेडमधील बसचालक असल्याचे मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले आहे. गुरुवारी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शासनाच्या परवानगीने नांदेडमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंच्या एका तुकडीला  पाच दिवसांपूर्वी दहा खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंजाबला नेऊन सोडण्यात आले. राजकीय लोकांच्या उपस्थितीत या यात्रेकरूंना निरोप देण्यात आला.  पंजाब येथून परतल्यानंतर त्या ट्रॅव्हल्स हद्दीबाहेर थांबवून त्यात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच बसचालकांना तेथूनच थेट संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले. तेथे गुरुवारी त्यांचे नमुने घेण्यात आले.

आणखी वाचा- लॉकडाउन : अडकलेल्या माणसांसाठी सरकारची हेल्पलाईन; इथे संपर्क करून मिळवा मदत

नांदेडमधील करोना बाधितांची संख्या आता सहावर गेली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. पंजाब येथे प्रवाशांना सोडून परतलेल्या अबचलनगर येथील एका चालकाला करोनाची बाधा झाल्याने त्याच्यावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधित चारही जण आता पंजाब येथून परतलेले चालक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 1:03 pm

Web Title: coronavirus lockdown travel bus drivers tests positive returned from punjab in nanded sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउन : अडकलेल्या माणसांसाठी सरकारची हेल्पलाईन; इथे संपर्क करून मिळवा मदत
2 अखेर ठरलं! : उद्धव ठाकरेंवरील संकट टळलं, २१ मे रोजी विधान परिषद निवडणुका
3 १ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश महाराष्ट्र दिनी प्रकाशित
Just Now!
X