News Flash

Coronavirus : शहापुरात सापडला लो रिस्क संशयित रुग्ण

त्यांना चाचणीसाठी कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अफवांचे पीक आले असून शहापुरात परदेश दौऱ्याहून आलेला एक लो रिस्क सस्पेक्टेड रुग्ण आढळून आला आहे. त्याची प्रकृती व्यवस्थित असली तरी सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना शहापुरच्या उपजिल्हा रुग्णालयातून मुंबईच्या कस्तुरबा येथील रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

शहापुरातील एका ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लक्षणं असून सध्या तो पसार झाला असल्याची अफवा शहापुरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, याबाबत शहापूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित व्यक्ती पसार झाली नसून शहापुरातच आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा- Coronavirus: करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास धोब्यांचा नकार!

ते २६ डिसेंबर २०१९ ला परदेशात गेले होते. तसंच १० फेब्रुवारी २०२० ला ते परत आले. ११ मार्च २०२० रोजी त्यांना सर्दी, खोकला झाला होता म्हणून तपासणीसाठी प्रथम शहापुरच्या खासगी रुग्णालयात व नंतर भिवंडी येथील संघवी रूग्णालयात गेले. त्यामध्ये कावीळ आणि खोकला झाला होता असे निष्पन्न झाले होते. आज आरोग्य विभागाकडून रुग्णाचा सर्व इतिहास जाणून घेतल्यानंतर त्यांना शहापूर उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी रुग्णाची प्रकृती व्यवस्थित असून सावधगिरी बाळगण्यासाठी लो रिस्क सस्पेक्टेड रुग्ण म्हणून योग्य तपासणीसाठी त्यांना मुंबईच्या कस्तुरबा येथील रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे सांगितले.

आणखी वाचा- CoronaVirus : प्रेरणादायी गोष्ट; जगभर थैमान घालणारा ‘प्लेग’ कोल्हापुरात टिकू शकला नाही

दरम्यान, शहापुरसह तालुक्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींचे युद्धपातळीवर सर्वेक्षण करून योग्य खबरदारी घेण्याबाबत तातडीने सूचना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 11:25 am

Web Title: coronavirus low risk suspected guy sent to kasturba hospital mumbai for test jud 87
Next Stories
1 ‘करोना’ संशयितांची नाव उघड करणारा मनसे उपाध्यक्ष गोत्यात
2 CoronaVirus : प्रेरणादायी गोष्ट; जगभर थैमान घालणारा ‘प्लेग’ कोल्हापुरात टिकू शकला नाही
3 Coronavirus: करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास धोब्यांचा नकार!
Just Now!
X