News Flash

#MissionBeginAgain: ठाकरे सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध शिथील

ठाकरे सरकारचं नवं मिशन सुरु

संग्रहित

करोनाला रोखण्यासाठी कडक लॉकडाउन पाळल्यानंतर आता राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडानचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपल्यानंतर कंटेनेमेंट झोन वगळता निर्बंध शिथील केले जातील असे संकेत आधीच देण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना राज्यातील निर्बंध ३ जूनपासून टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार राज्य सरकाकडून एक नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिथीलता देण्यात आलेल्या सहा गोष्टींचा समावेश आहे.

कोणते निर्बंध शिथील –
१) बाहेर व्यायाम करण्याची परवानगी. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.

२) दुकान सम-विषय नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील. नियमांचं पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसंच दुकानं मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं.

३) खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी. खासगी कार्यालयं १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकतात. इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करावं लागेल. यावेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल. जेणेकरुन कर्मचारी घरी परतल्यानंतर ज्यांना सहजपण लागण होऊ शकते त्यातही खासकरुन वृद्धांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ८ जून २०२० पासून हा निर्णय लागू होईल.

४) रविवारपासून म्हणजेच ७ जून २०२० पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

५) शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.

६) मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आता पासची गरज नसून कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांवर नियमितपणे लक्ष ठेवलं जाणार आहे. अडकलेले मजूर, स्थलांतरित कामगार, पर्यटक यांच्या प्रवासावर आधीच्या नियमांप्रमाणे नियंत्रण असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 4:22 pm

Web Title: coronavirus maharashtra government mission begin again cm uddhav thackeray new guidelines sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुदत संपलेल्या दीड हजार ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय
2 Unlock 1.0 : दुकानं उघडण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी; नवी नियमावली जाहीर
3 खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी, राज्य सरकारचा आदेश जारी
Just Now!
X