देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पुणे आणि औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. आता महाराष्ट्रात करोना चाचणीसाठी एका नव्या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. अँटिन्टीजेन आणि अँटिन्टीबॉडी टेस्टनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आता आवाजावरून कोविड टेस्ट करणार आहे. या नव्या प्रयोगात ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते
कोविडचे निदान करण्यासाठी गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेन्टंरमध्ये व्हॉईस सॅम्पलिंग पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंन्टरमध्ये कोविड असणाऱ्या आणि संशयित असणाऱ्या १००० रूग्णांनावर सध्या एआय-आधारित व्हॉईस सॅम्पलिंगचा वापर करून चाचणी करण्यात येणार आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुऱेश काकाणी यांनी दिली आहे.

ध्वनी लहरींच्या या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान स्पष्ट होणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसआर चाचणीने निदान पक्के केलं जाणार आहे. फ्रान्स आणि इटलीसह काही युरोपियन देशांमध्ये कोविड 19ची चाचणी करण्यासाठी करोना संशियताच्या आवाजाचा वापर केला गेला आहे. ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसतात तेव्हा त्यांना श्वासाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. या सर्व प्रक्रियेत फुफ्फुसांच्या स्नायूंवर ही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्यामुळे आवाजावर परिणाम होतो. आवाजावर परिणाम झाल्यामुळे त्यात बदल होतो आणि याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तिला कोरोना झाला आहे का नाही हे स्पष्ट होते. आता याच पद्धतीचा वापर महाराष्ट्रातही होणार आहे. याची सुरुवात मुंबईमधून केली जाणार आहे.

शिवसेना नेता आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आदित्या ठाकरे म्हणाले की, ‘बीएमसी आता आवाजावरून कोविड टेस्ट करणार आहे. एआय-आधारित व्हॉईस सॅम्पलिंगचा वापर करण्यात येणार आहे. आरटी पीसीआर चाचण्या होत राहतील. मात्र जागतिक स्तरावरील चाचण्यांचे तंत्रज्ञान पाहिल्यास या महामारीने आपल्याला गोष्टींकडे वेगळ्या नजरेतून पाहण्याची संधी दिली. आपल्या आरोग्य विषयक गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर याच काळामध्ये अधिक वेगाने वाढला आहे.’

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी नवनवीन योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून आवाजावरून कोविड टेस्ट करण्याची नवीन पाऊल उचलण्यात येत आहे. शनिवारपर्यंत महाराष्ट्रातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ६७.२६ टक्के इतकं होतं. तर शनिवारी राज्यात १२ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.