03 December 2020

News Flash

Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात आढळले १० हजार ३२० रुग्ण, मृतसंख्या १४ हजार ९९४ वर

महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या ४ लाख २२ हजार ११८ वर

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात दिवसभरात १० हजार २३० करोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचली आहे. तर २६५ जणांचा मृत्यू झाला असून मृतसंख्या १४ हजार ९९४ इतकी झाली आहे. दिवसभरात ७५४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख ५६ हजार १५८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घऱी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ६०.६८ टक्के आहे. तर मृत्यूदर ३.५५ टक्के आहे. आतापर्यंत २१ लाख ३० हजार ९८ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ४ लाख २२ हजार ११८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सध्या ८ लाख ९९ हजार ५५७ जणा होम क्वारंटाइन आहेत. तर ३९ हजार ५३५ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 8:38 pm

Web Title: coronavirus maharashtra reported 10320 new cases and 265 deaths sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 देवेंद्र फडणवीसांना कदाचित WHO तूनही मार्गदर्शनासाठी बोलावतील-उद्धव ठाकरे
2 आणीबाणी काळातील सन्मान योजना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान देणार
3 करोनावरची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागेल-गडकरी
Just Now!
X