महाराष्ट्रात दिवसभरात ९ हजार ५०९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. तर २६० जणांचा मृत्यू झाला असून यासोबत मृत रुग्णांची संख्या १५ हजार ५७६ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून यामधील सर्वाधिक केसेस पुण्यात आहेत. पुण्यात सध्या करोनाचे ४४ हजार २०१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज ९ हजार ९२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट ६२.७४ इतका झाला आहे. सोबतच मृत्यूदर ३.५३ टक्के इतका आहे. आतापर्यंत २२ लाख ५५ हजार ७९१ करोना चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ४ लाख ४१ हजार २२८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सध्या ९ लाख २५ हजार २६९ जण होम क्वारंटाइन असून ३७ हजार ९४४ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.