24 February 2021

News Flash

उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला

संग्रहित

राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलनं, मोर्च काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना करोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

छगन भुजबळ यांना करोनाची लागण; नुकतीच शरद पवारांसोबत लग्नाला लावली होती हजेरी
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारोंची गर्दी; शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी

शरद पवार यांनी ट्विट करत आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणालेत की, “करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत”.

छगन भुजबळांसोबत लग्नाला उपस्थिती
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी”.

विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी शरद पवारदेखील उपस्थित होते. शरद पवार आणि भुजबळ एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने आता शरद पवारांचीदेखील करोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 11:18 am

Web Title: coronavirus ncp sharad pawar tweet after cm uddhav thackeray appeal sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 छगन भुजबळ यांना करोनाची लागण; नुकतीच शरद पवारांसोबत लग्नाला लावली होती हजेरी
2 साखर कारखान्यांतून आता जैव सीएनजी उत्पादन
3 नद्यांचे संवर्धन होणे गरजेचे – पवार
Just Now!
X