News Flash

सुप्रिया सुळेंनी जे जे रुग्णालयात घेतली करोना लस

देशभरात सोमवारी करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली

Photo: Instagram

देशभरात सोमवारी करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या लसीकरणाने करोना याची सुरुवात झाली. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात सकाळी ७ वाजता देशी ‘कोव्हॅक्सिन’ची लस घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील लस घेतली असून पात्र असणाऱ्या सर्वांना घेण्याचं आवाहन केलं आहे. याआधी शरद पवार यांनीदेखील जे जे रुग्णालयात जाऊन करोना लस घेतली.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लस घेतल्याची माहिती दिली आहे. “मुंबईमधील जे जे रुग्णालयात मी करोना लसीचा पहिला डोस घेतला. डॉक्टर लहाने आणि जे जे रुग्णालयातील सर्व टीमचे आभार. करोना लस सुरक्षित आहे. सर्वांना विनंती आहे की, नोंदणी करा आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा लस घ्या”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येत आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जाईल.

देशात लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील करोनायोद्धय़ांच्या लसीकरणासाठी सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशी वापरल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात दोन्ही लशींच्या परिणामकारकतेबाबत शंका घेतल्या गेल्या होत्या. तिसरी चाचणी न झालेल्या देशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापरास परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीकाही झाली होती. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून आक्षेप नोंदवले होते.

या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येत आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे. लसीकरणासाठी अनेक नेते पात्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, व्यंकय्या नायडू यांनी पहिल्या दिवशी लसीकरण करुन घेतलं. याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील करोना लस घेतली.

मात्र काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी करोना लसीसाठी तरुणांना प्राथमिकता दिली पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. “माझं वय ७० पेक्षा जास्त आहे. तुम्ही तरुणांना करोना लस दिली पाहिजे आणि त्यांचं आयुष्य वाढवावं. माझ्याकडे जगण्यासाठी १० ते १५ वर्षच आहेत. पण तरुणांकडे संपूर्ण आयुष्य आहे. मी देखील करोना लस घेणार आहे,” असं खरगे म्हणाले आहेत.

पात्र असणाऱ्या सर्व खासदारांना ८ मार्चला अधिवेशन सुरु होण्याआधी लस दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ७७७ खासदारांपैकी ३६६ खासदारांच वय ६० हून अधिक असून लसीकरणास ते पात्र आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 9:46 am

Web Title: coronavirus ncp supriya sule vaccinated in jj hospital mumbai sgy 87
Next Stories
1 “कशासाठी जनतेच्या जिवाशी असा खेळ करीत आहात?”
2 जेमतेम ४० जणांना डोस
3 कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना करोनाचा फटका
Just Now!
X