28 September 2020

News Flash

“मुख्यमंत्र्यांनी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर निलेश राणेंनी साधला निशाणा

निलेश राणे आणि उद्धव ठाकरे

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विरोधी पक्ष नेत्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर करोनाचे संकट दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आता मेअखेपर्यंत काळजी घेऊन आपणास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्यांनी राज्यात लॉकडाउन आणखी लांबण्याचे संकेत दिले आहेत. यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. “लॉकडाउन वाढवणे हा एकमेव पर्याय राज्य सरकारकडे आहे,” असं ट्विट राणे यांनी केलं आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आयुष्य घरात बसून काढल्याने त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही असा टोला राणेंनी लगावला आहे. ट्विटवरुन लॉकडाउन वाढवण्यासंदर्भातील बातमीवर प्रतिक्रिया देताना राणे यांनी, “राज्य सरकारकडे लाॅकडाऊन वाढवणे हा एकच उपाय आहे कारण बाकी सगळीकडे ते फेल झाले आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना काही फरक पडत नाही पण परिस्तिथी गंभीर आहे आणि या सरकारकडे नियोजन नाही दूरदृष्टी नाही याची चिंता वाटते,” असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे बैठकीमध्ये नक्की काय म्हणाले?

याबैठकीमध्ये बोलताना उद्धव यांनी मे महिना सरेपर्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. “लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात करोनाची साथ नियंत्रणात राहिली. आता मेअखेपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वानी सहकार्य केल्यास यात यश येईल. महिना सरेपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल. त्यामुळे नारिंगी आणि हिरव्या क्षेत्रातील धोका वाढणार नाही,” असं उद्धव यांनी सर्व पक्षीय नेत्यांना सांगितलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासंदर्भात सरकार प्रयत्न करत आहे अशी माहिती दिली. “ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

आणखी वाचा- सरकारला कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार, पण…– देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे घेतली. करोनाविरोधी लढय़ात आम्ही राज्य सरकारसोबत आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 4:13 pm

Web Title: coronavirus nilesh rane slams cm uddhav thackeray says he is not serious about covid 19 situation in maharashtra scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Lockdown: येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची फी वाढ नाही; राज्य शासनाचा पालकांना दिलासा
2 विधानपरिषद निवडणूक : मुंडे-खडसेंचा पत्ता कापला, भाजपत पुन्हा आयारामांना संधी
3 विद्यार्थ्यांना दिलासा : अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द
Just Now!
X