News Flash

#coronavirus : पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर बंद ठेवण्याचे आदेश

पहिल्यांदाच इतक्या कालावधी पर्यंत मंदिर राहणार बंद, जाणून कोणत्या तारखेपर्यंत मंदिर बंद ठेवले जाणार

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी (ता.15) रात्री 8:30 वाजता बल्लाळेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. मंदिर निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या कालावधी पर्यंत बंद राहणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.14) रायगड जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पाली, तालुका सुधागड बल्लाळेश्वर मंदिर, खालापूर तालुक्यातील महड वरदविनायक मंदिर, उरण तालुक्यातील घारापुरी लेणी तसेच खालापूर तालुक्यातील इमॅजिका वॉटर पार्क 31 मार्च पर्यंत नागरिकांना प्रवेशासाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे पालन पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टने ताबडतोब केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रविवारी (ता.15) रात्री पुढील सूचना मिळेपर्यंत बल्लाळेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धंनजय धारप यांनी दिली.

प्रशासनाने काढलेले आदेश सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी मंदिर ट्रस्टला दिल्यावर ताबडतोब ट्रस्टने खबरदारी घेऊन मंदिर बंद करण्याचा निर्णय घेऊन सहकार्य केले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धंनजय धारप, सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे उपस्थित होते. यावेळी जिप सदस्य सुरेश खैरे, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 9:59 pm

Web Title: coronavirus order to close ballaleshwar temple in pali msr 87
Next Stories
1 समुद्रात भरकटणाऱ्या बोटीतून चार मच्छिमारांचा जीव वाचला
2 MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित, करोनामुळे राज्य सरकारचा निर्णय
3 … तर करोनाबाधित रुग्णांना नजरकैदेत ठेवणार; आरोग्यमंत्री टोपे
Just Now!
X