CoronaVirus Outbreak : राज्यासह देशात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणाला रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. जागोजागी विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागत आहे. त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्या ओस पडू लागल्या आहेत. आजघडीला राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे.

COVID-19 : T20 World Cup जिंकवून देणारा क्रिकेटपटू बजावतोय पोलिसाचं कर्तव्य

करोनाच्या भितीपोटी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसह शहरी भागातील रक्तदान शिबिरे ठप्प पडली आहेत. परिणामी राज्यातील रक्तपेढ्यांमधे रक्ताच्या पिशव्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली असून केवळ काहीच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा रक्तपेढ्यांमध्ये आहे, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याला दुजोरा दिला असून लोकांनी गर्दी न करता रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

CoronaVirus : “विराट, सचिन.. लाज वाटते की नाही..?”; नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप

राज्यातील करोनाग्रस्तांसाठी विविध सेलिब्रिटी आर्थिक मदत करत आहेत. अन्नधान्याचा साठा पुरवत आहेत. या दरम्यान, भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव हा मृत्युशी झुंजणाऱ्या करोनाग्रस्तासाठी देवदूत ठरला आहे. पुण्यात एक करोना रूग्ण मृत्युशी लढा देत होता. त्याला रक्ताची अत्यंत गरज होती. आपला ३५ वा वाढदिवस असणाऱ्या केदार जाधवने थेट पुण्याच्या रूग्णालयात जाऊन रक्तदान केले.

चहलचा वडिलांसोबत भन्नाट Tik Tok व्हिडीओ

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केदार जाधव याने अत्यंत संकटात असणाऱ्या एका पुण्यातील रूग्णाला रक्तदान केले आणि माणुसकीचे दर्शन घडवून दिले. ब्लड सेवा परिवार आपल्या कृत्याला नमन करत आहे. आपणही यातून प्रेरणा घेऊन रक्तदान करा, असे ट्विट केले आहे.

BCCI ने धोनीला वगळलं; चाहत्यांमध्ये संतापाची लाट

केदार जाधव IPL च्या पूर्वतयारीसाठी चेन्नई सुपर किंग्स संघासोबत चेन्नईत होता. पण करोनाच्या संकटामुळे IPL पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे चेन्नईचे सराव सत्रही रद्द करण्यात आले. म्हणून तो पुण्याला परतला.