अनेक व्यवासायिकांची कर्ज परतफेड रखडली; संलग्न व्यावसायिकांचेही कंबरडे मोडले

लोकसत्ता वार्ताहर

entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा
Nashik, Foreign state Businessman, Mobile parts, Shut Shops, Second Day, Dispute, Local Marathi Businessmen,
नाशिकमध्ये अमराठी व्यावसायिकांकडून मराठी युवकांची कोंडी, दुकाने बंद राहिल्याने भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम ठप्प

पालघर : पालघर जिल्ह्यत करोनातून जनजीवन पूर्वपदावर येत असताना दुसऱ्या लाटेच्या भीतीने प्रशासनाने लग्न समारंभ व इतर समारंभांवर र्निबध घातल्यामुळे मंडप सजावट यांच्यासह भोजनावळ व्यवसाय व संलग्न साखळी व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. यातील अनेक व्यवसायिकांनी बँकेची कर्ज काढल्यामुळे ती कर्ज फेडायची कशी, असा मोठा प्रश्न या व्यवसायिकांना समोर पडला आहे.

करोनाची दुसरी लाट येते की काय अशा भीतीने पालघर जिल्ह्यत होऊ घातलेल्या लग्न समारंभ व इतर समारंभांवर जिल्हाधिकारी यांनी र्निबध घातले असून या समारंभांसाठी पन्नास व्यक्तींपेक्षा जास्त जणांना प्रवेशास र्निबध केले आहेत. अलीकडेच जिल्हाधिकारी यांनी स्वत: अशा अनेक लग्नाच्या ठिकाणी जाऊन कारवाई केल्या आहेत. मात्र याचा फटका मंडप सजावट, भोजनावळ व्यवसायिक व इतरांना बसला आहे.

या सर्वाचा इतर कोणताही व्यवसाय नसल्याने पुन्हा त्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या आहेत. याआधीही पालघर जिल्हा मंडप सजावट संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नसल्याचे मंडप सजावट व्यावसायिक सांगतात.

पालघर जिल्ह्यत सद्यस्थितीत सुमारे ६०० लहान- मोठे मंडप व्यावसायिक असून एक हजाराहून अधिक भोजनावळीचा व्यवसाय करीत आहे. शिवाय लग्नसमारंभासाठी लागणारे डीजे, घोडेवाले, फूल सजावट, रोशनाई, ध्वनी यंत्रणा, भोजनावळीसाठी लागणारे कर्मचारी, व्हिडीओ ग्राफर आदी व्यावसायिकही आहेत. सद्यस्थितीत लग्नसमारंभाला मर्यादित परवानगी असल्याने या सर्व व्यावसायिकांना अल्प प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. यातून कर्मचारी व स्वत: चा खर्चही सुटत नाही.

तसेच अलीकडच्या काळात लग्न मुहूर्ताच्या वेळीच हे र्निबध आणल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पालघर जिल्ह्यतील चाळीस ते पन्नास हजारांच्या जवळपास लोकांचा हातचा रोजगार गेल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नियमावली आखून किंवा तयार करून जास्त संख्यासाठीच्या समारंभांना परवानगी दिल्यास या व्यवसायिकांना दिलासा मिळेल अशी मागणी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

‘नियम अटी टाकून परवानगी द्यावी’

लग्न समारंभांना ५० हून अधिक व्यक्तींना प्रवेश नसल्याने किंवा ही लग्नसमारंभ मर्यादित राहून करावयाची असल्याने अशा वेळी मंडप सजावट यांच्यासह भोजनावळ व लग्नाशी निगडित असलेल्या कामांचा व्यवसाय करणाऱ्यांना संधी मिळत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांसह या व्यवसायावर उदरनिर्वाह करत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या साखळ्या नष्ट होत आहेत. प्रशासनाने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करून असे समारंभ करण्याची परवानगी द्यावी किंवा ज्या ठिकाणी लग्न होत आहेत अशा ठिकाणांना त्यांच्या उपलब्ध क्षमतेप्रमाणे नियम अटी टाकून परवानगी द्यावी अशी मागणी या संघटनेची आहे.

असा अन्याय का?

एकीकडे पालघर जिल्ह्यत जास्त गर्दी होऊ नये यासाठी र्निबध घातल्याने आमच्या व्यवसायांवर उपासमारीची वेळ येत आहे व दुसरीकडे पालघरमधील मोठमोठे मॉल्स, मोठी दुकाने, सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असल्याने अशा ठिकाणांना र्निबध का नाही असा सवालही संघटना उपस्थित करीत आहे.

हजारो जणांना रोजगार देणाऱ्या या क्षेत्राला काम मिळत नसल्याने हा व्यवसाय अखेरची घटका मोजत आहे. असे होऊ नये यासाठी व्यावसायिक व त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी वर्ग यांचा विचार व्हावा.

– नचिकेत ठाकूर, भोजनावळ व्यावसायिक

र्निबध आणल्याने हाताला पुरेसे काम नाही. जे काम मिळत आहे, ते अत्यल्प आहे. यात स्वत: व कामगारांचा गुजराण कसा करायचा हा प्रश्नच आहे. बँकांची कर्जे थकल्याने बँका तगादा लावत आहेत.

— मनीष जुन्नरकर, मंडप व्यावसायिक