देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी राज्यात १५ हजार ७६५ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ८ हजार ३०६ वर पोहोचली आहे. तसंच राज्यात सध्या दोन लाखांच्या जवळपास अॅक्टिव्ह केसेस असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिवसभरात १० हजार ९७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मंगळवारी राज्यात १५ हजार ७५६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ३२० मृत्यूंचीही नोंद करण्यात आली. राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ५ लाख ८४ हजार ५३७ रूग्णांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्के इतका झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत ४२ लाक ११ हजार ७५२ करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ लाख ८ हजार ३०६ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

देशात करोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४.३ कोटी पेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. मागील दोन आठवड्यांमध्ये १ कोटी २२ लाख ५१४ चाचण्या झाल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये करोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत, त्यामध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्यं अग्रस्थानी आहेत. देशभरात मागील चोवीस तासांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत.