30 October 2020

News Flash

डोंबिवलीत आढळला करोनाचा पहिला रुग्ण

राज्यात करोनाने थैमान घातलं असताना डोंबिवलीत पहिला रुग्ण आढळला आहे

राज्यात करोनाने थैमान घातलं असताना डोंबिवलीत पहिला रुग्ण आढळला आहे. राज्यात सोमवार रात्रीपासून करोनाच्या १८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सहा, सांगली मधील इस्लामपूरचे चार, पुण्याचे तीन, सातारा जिल्ह्यातील दोन तर अहमदनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे आठ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत २५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतीजोखमीच्या देशातून येणा-या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत.

दरम्यान, काल संध्याकाळी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात करोनाबाधित असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दुबई मध्येच स्थायिक असलेली व्यक्ती १५ मार्च २०२० रोजी अहमदाबाद येथे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी आली होती. त्यानंतर ते मुंबईत आले. २० मार्चपासून त्यांना ताप येणे सुरु झाले. २३ मार्च रोजी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यातआले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. कोरोनामुळे राज्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

राज्यात कुठे किती रुग्ण –
पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे -१८
मुंबई – ४१
नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली – ५
नागपूर, यवतमाळ,सांगली – प्रत्येकी  ४
अहमदनगर, ठाणे – प्रत्येकी ३
सातारा – २
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण – प्रत्येकी १
एकूण – १०७
मृत्यू – ३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 7:44 pm

Web Title: coronavirus patient in dombivli sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 होम क्वारंटाइनचा रुग्ण रस्त्यावर फिरल्याने भाईंदरमध्ये खळबळ
2 आज मुंबई परिसरात अंक नाही
3 ठाण्यात दहापेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई
Just Now!
X