News Flash

अकोल्यात करोनाबाधिताची आत्महत्या

रुग्णांने शनिवारी पहाटे गळ्याला ब्लेड मारून स्वतःला गंभीर जखमी करून घेतले.

( संग्रहित छायाचित्र )

शहरातील सर्वोपचार रुग्णालयातील अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात उपचार सुरू असलेल्या करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. करोनाबाधित रुग्णाने आज, शनिवारी पहाटे गळ्याला ब्लेड मारून स्वतःला गंभीर जखमी करून घेतले. त्यानंतर उपचारादरम्यान त्या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून दि.७ एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज (दि.११) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले. मयत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम (वय ३०वर्षे) असे असून तो मूळचा सालपडा जि. नागाव,आसाम येथील रहिवासी आहे. काल दि.१० रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने ४० जणांचा जीव घेतला असून तब्बल एक हजार ३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा सात हजार ४४७ वर पोहचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 12:21 pm

Web Title: coronavirus patient suicide in akola nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता
2 करोना विरोधातील लढ्यासाठी आरती समूहाकडून 17.6 कोटींचे सहकार्य
3 पृथ्वीराज चव्हाण करोना व्हायरसला बायोलॉजिकल टाइमबॉम्ब का म्हणाले?
Just Now!
X