News Flash

धक्कादायक : सोलापुरात १०२ नवे करोनाबाधित; ९ जणांचा मृत्यू

आतापर्यंत १००१ रुग्ण बरे

संग्रहित

सोलापुरात शुक्रवारी रात्री हाती आलेल्या माहितीनुसार १०२ नव्या करोनाबाधित रूग्णांची भर पडली. यात नऊ मृतांचा समावेश आहे.

शुक्रवारी आढळून आलेल्या नव्या रूग्णांमध्ये शहरातील ९० आणि ग्रामीण भागातील १२ रूग्णांचा समावेश आहेत. मृत्यू झालेले सर्व ९ जण शहरातील राहणारे होते. शहरातील १ हजार ८४४ तर ग्रामीणमधील १६१ अशी एकूण रूग्णसंख्या २००५ इतकी झाली आहे. मृतांमध्ये शहरातील आकडा १५४ इतका आहे. आज मृत्यू झालेले रूग्ण ६० ते ९० या वयोगटातील आहेत. तर नव्याने सापडलेले ९० रूग्ण विखुरलेल्या ७६ ठिकाणचे रहिवासी आहेत.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यात आज 102 करोनाबाधितांची वाढ ; एकूण संख्या 3 हजार 340 वर

जिल्हा ग्रामीण भागात सर्वाधिक ७० रूग्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातील असून त्यातही कुंभारी येथील नवीन घरकूल परिसरात राहणारे आहेत. अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर तसेच मोहोळ, माळशिरस आदी भागात पुन्हा नवे रूग्ण आढळून येत आहेत. तथापि, एकीकडे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी दुसरीकडे रुग्ण करोनामुक्त होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. शुक्रवारअखेर १००१ रूग्ण (४९.९२ टक्के) करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 8:05 am

Web Title: coronavirus patients increased in solapur jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मागणी घटल्याने कांदादर कोसळला
2 कोविड रुग्णालयाच्या पाहणीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक उणिवा उघड
3 काशिद समुद्र किनाऱ्यावर भयाण शांतता
Just Now!
X