News Flash

Coronavirus: रत्नागिरीत आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांवर जमावाचा हल्ला, वाहनांवर दगडफेक

राजापूर तालुक्यात आरोग्य कर्मचारी आणि पोलीस पथकावर जमावाकडून दगडफेक

रत्नागिरीमधील राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. आरोग्य कर्मचारी करोनाबाधित रुग्णाला आणण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. जमावाने शासकीय वाहनांवरही दगडफेक केली. यामध्ये पोलिसांच्या गाडीच्या काचा फुटल्या. हल्ल्यात एका आरोग्य कर्मचार्‍यालाही दुखापत झाल्याचं कळत आहे.

रूग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर तसंच त्यानंतर आलेल्या पोलीस पथकावर काही लोकांनी हल्ला केला. साखरीनाटे येथे सोमवारी दोन करोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले होते. त्यामधील एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावातील आणखी एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रूग्णाला आणण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचे एक पथक रूग्णवाहिका घेवून गेले होते.

आणखी वाचा- गडचिरोली : विलगीकरणातील ७१ ‘एसआरपीएफ’ जवान करोनाबाधित

पण तिथे जमलेल्या लोकांनी रूग्णाला नेण्यास विरोध केला. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांनी पोलिसांची मदत घेतली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतरही जमावाने आपले म्हणणे सोडले नाही. जमावाने कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला केला. शासकीय वाहनांवरही दगडफेक केली. हल्ल्यात एक आरोग्य कर्मचारी जखमी झाल्याचं कळत आहे. गावागावात करोना रूग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण असताना करोना योद्धे म्हणून दिवस-रात्र झटणाऱ्या यंत्रणेवरच हल्ले होत असल्याने आता चिंतेचे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 3:06 pm

Web Title: coronavirus police and heath officials attacked in ratnagiri sgy 87
Next Stories
1 गडचिरोली : विलगीकरणातील ७१ ‘एसआरपीएफ’ जवान करोनाबाधित
2 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आत्मबलिदान आंदोलनाची हाक
3 भाजपाच्या ‘वाघा’लाही केवळ एक सभा घेऊन लोळवणारा बारामतीचा नेता…
Just Now!
X