29 September 2020

News Flash

Coronavirus : दुकानात नागरिकांची झुंबड, पोलिसांकडून मालकाला उठा-बशा काढण्याची शिक्षा

राज्यात करोनानं थैमान घातलं असून नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत

राज्यात करोनानं थैमान घातलं असून नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जनता संचारबंदी नंतर शहरातील अनेक किराणा दुकानांवर नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. पुण्यातही आज एका दुकानात अशीच गर्दी झाली होती. त्यामुळे सांगवी पोलिसांनी दुकान मालकालाच पकडलं आणि उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. प्रशासनाने अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाच्या दुकानांवर बंदी घातलेली नाही. मात्र, तरीही नागरिक गैरसमजामुळे दुकानांवर गर्दी करत आहेत.

रविवारी पिंपरी-चिंचवडकरांनी जनता संचारबंदीचं काटेकोरपणे पालन केलं. करोना विषाणूशी लढा देणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, राज्य आणि केंद्र शासन आणि इतर कर्मचाऱ्यांचे टाळ्या आणि थाळी वाजवून आभार मानले. दरम्यान, रविवारी दिवसभर कडेकोट बंदोबस्त असल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. अनेकांना किराणा मालाचे दुकान केव्हाही बंद पडू शकते असा गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे ृशहरात प्रत्येक किराणा दुकानावर प्रचंड गर्दी झाली होती. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानावरही नागरिकांची अशीच गर्दी झाली होती. त्यामुळे गर्दी झालेल्या दुकान मालकाला बोलावून २० उठाबशा काढण्याची शिक्षा पोलिसांनी दिली. प्रशासनाने गर्दी टाळण्याचे सक्त आदेश दिले असले तरी नागरीक याचं पालन करताना दिसत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 3:11 pm

Web Title: coronavirus police punish shop owner in pune kjp91 sgy 87
Next Stories
1 Coronavirus: धक्कादायक! एका महिलेच्या चुकीमुळे पुण्यातील २५ गावांसह ८१ ग्रामस्थांचं विलगीकरण
2 ज्यांनी डॉक्टरांवर हात उचलले त्यांना आता त्यांच महत्त्व कळलं असेल : राज ठाकरे
3 Coronavirus: होम क्वारंटाइन असतानाही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल, रायगडमधील पहिलीच घटना
Just Now!
X