करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक आगळावेगळा मिस्ट सॅनिटायझर कक्ष सुरू केला आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात येत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील मिस्ट रेझोनन्स इंजिनिअरिंग या कंपनीने मिस्ट सॅनिटायझर देणगी स्वरुपात दिला आहे.

हा नाविन्यपूर्ण निर्जंतुकीकरण कक्ष नायडू हॉस्पिटल येथील करोना उपचार केंद्रात कार्यान्वित करण्यात आला आहे. याची खासियत म्हणजे या उपकरणांमध्ये स्वयंचलित सेन्सर आहे. व्यक्ती या कक्षामध्ये प्रवेश करताच सेन्सर आपोआप कार्यान्वित होऊन द्रव रुपात सोडियम हायपोक्लोराईड द्रावण फवारले जाते. हे द्रावण मानवी शरीरासाठी सुरक्षित असून ती व्यक्ती आत प्रवेश करताच 10 सेकंदात निर्जंतुक होते. कक्षात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने कक्षाबाहेर ठेवण्यात आलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. या दरम्यान सेन्सर कार्यान्वयित होतात.

या उपकरणामुळे हॉस्पिटलमध्ये आत बाहेर करावे लागणाऱ्या सर्व व्यक्ती उदाहरणार्थ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण होणार आहे. या सॅनिटायझर कक्षामुळे सर्वांना निर्जंतुक करून करोनाला दूर ठेवण्यात मोठी मदत होणार आहे. यासाठीच पुणे महानगरपालिकेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, “करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि संबंधित कर्मचारी वर्ग यांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांचीही विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने डॉ. नायडू रुग्णालयात हा निर्जंतुकीकरण कक्ष महत्त्वाचा ठरणार आहे.”