06 March 2021

News Flash

लॉकडाउन उठवण्यापासून ते रोजगारापर्यंत राज यांच्या ‘ठाकरे सरकार’ला १२ महत्वाच्या सूचना

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत राज यांनी अनेक महत्वाच्या विषयांबद्दल सरकारला सूचना केल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्व विरोधीपक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या विरोधीपक्ष नेत्यांबरोबर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राज मंत्रालयामध्ये या बैठकीसाठी पोहचले. राज यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना दिलेल्या सूचनासंदर्भात माहिती दिली. जाणून घेऊयात काय सूचना दिल्या आहेत राज यांनी…

१)
मागील दीड महिन्यापासून नियुक्त करण्यात आलेले पोलीस थकलेले आहेत. पोलिसही अतिरिक्त कामामुळे तणावाखाली आहेत. सध्या रमजानचा काळ सुरु आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काहीजण पोलिसांना अगदीच गृहीत धरायला लागलेत. अशा ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) नेमणूक करावी.

२)
एसआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्याने पोलिसांना गृहीत धरल्या जाणाऱ्या भागांमध्ये दरारा निर्माण होऊन लोकं घाराबाहेर येणार नाहीत. सध्याचा काळ हा रमजानचा असून अनेक लोकं घराबाहेर येतायत. आपण अनेक सण घरामध्ये साजरे केले. मुस्लीम समाजाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. विचार होत नसेल तर अशा ठिकाणी अतिरिक्त फोर्स लावणे गरजेचे आहे.

३)
छोटे दवाखाने सुरु करावेत अनेक ठिकाणी काहीजण आजारी पडत आहेत. त्यांना समज नाहीय की यासंदर्भात कोणाकडे जावे. अनेक दवाखाने बंद आहे. त्यामुळे हे छोटे दवाखाने फायद्याचे ठरतील. हे दवाखाने सुरु करताना तिथे एखादा पोलीस नियुक्त करावा. म्हणजे जास्त गर्दी झाल्यास तो त्यावर नियंत्रण करता येईल.

४)
स्पर्धा परिक्षांसाठी आलेल्या तसेच हॉस्टेलमध्ये अडकलेल्यांसाठी काय व्यवस्था करता येईल यासंदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.

५)
परप्रांतिय कामगारांची तपासणी केल्याशिवाय त्यांना राज्यात घेऊ नये. त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती असेल आपल्याला ठाऊक नाही. कारण इथे चाचण्या होत आहे आपण बघतोय पण तिकडे काय परिस्थिती आहे आपल्याला माहित नाही.  ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून बाहेर गेलेत. ते परत येतील तेव्हा तपासणीशिवाय त्यांना प्रवेश देऊ नये.

६)
परप्रांतिय परत आल्यानंतर त्याचवेळी त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती योग्य वेळ आहे कारण हे नंतर करता येणार नाही. आजपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये गोंधळ झाला होता. मात्र तो गोंधळ सुधारण्याची ही वेळ आहे असं मला वाटतं.

७)
जे परप्रांतिय परत गेले आहेत त्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील उद्योग आणि कारखाने बंद व्हायला नको. यासाठी महाराष्ट्रातील जे तरुण तरुणी आहेत त्यांची नोंद करुन जिथे जिथे रोजगार उपलब्ध आहेत त्यासंदर्भातील माहिती या रोजगाराची गरज असणाऱ्यांपर्यंत पोहचवावी.

नक्की वाचा >> मनसे अध्यक्ष राज ठाकरे विना मास्क मंत्रालयात

८)
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामधील तरुणांना रोजगार कुठे उपलब्ध आहे ठाऊख नसतं. तर आज परप्रांतिय बाहेर गेले आहेत या पार्श्वभूमीवर रोजगार कुठे उपलब्ध आहे हे या मुलांने कळवावे जेणे करुन त्यांना रोजगार उपलब्ध होईल. आज अगदी भाजी विकणाऱ्यांपासून ते कारखान्यामध्ये काम करणाऱ्यांपर्यंत अनेकजण बाहेर गेले आहेत आणि स्थानिकांना रोजगार देण्याची संधी आहे तर ती महाराष्ट्र शासनाने घालवू नये.

९)
जून महिन्यामध्ये कशापद्धतीने शाळा सुरु करणार. इ-लर्निंगवगैरे सारख्या गोष्टी सगळ्या ठिकाणी शक्य नाही. तर शाळा कशा सुरु करणार यासंदर्भातील माहिती पालकांना देणे गरजेचे आहे. यासंदर्भात निर्णय घ्यावा.

१०)
आज मे महिना आहे. जून महिन्यामध्ये शाळांच्या अडमिशन्स सुरु होतात. तर त्या कशा होणार याबद्दलची माहिती पालकांना कळवण्यात यावी.

११)
पालिका कर्मचारी, सरकारी कामगार, सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने मिळत नाहीयत. एक एक मास्क पाच पाच सहा सहा वेळा वापराल जातोय. ही गोष्ट योग्य नाही. सफाई कामगार आजारी पडतायत. त्यांनी हात वर केल्यास काय होणार? सर्व शहरे अस्वच्छ होतील. तर अशा लोकांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

१२)
लॉकडाउनचा एक्झीट प्लॅन काय आहे? १५ दिवसांनी किंवा कधीही लॉकडाउन काढावा लागणार. लस येत नाही तोपर्यंत लॉकडाउन ठेवता येणार नाही. लॉकडाउन काढायच्या १० ते १५ दिवस आधी लोकांना सांगणे गरजेचे आहे. कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, पुढे कसं जायचं आहे, एक दिवस सुरु केलं दुसऱ्या दिवशी बंद असं चालणार नाही. एक्झीट प्लॅन राज्य सरकारने लोकांसमोर ठेवावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 4:27 pm

Web Title: coronavirus raj thackeray give these 12 suggestions to uddhav thackeray government scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …तर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात – शिवसेना नेते संजय राऊत
2 रमजानमुळे रस्त्यावर होणारी गर्दी रोखण्यासाठी राज यांचा उद्धव यांना महत्त्वाचा सल्ला
3 कलानगरची सीट घालवणारे मंत्री अनिल परब निष्क्रिय; निलेश राणेंची टीका
Just Now!
X