राज्यातील करोना संसर्ग अधिक वेगाने वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह अन्य शहरांमध्येही करोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्याप्रमाणवर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशानसन जिल्हास्तरावर करोना नियंत्रणाच्यादृष्टीने निर्णय घेत आहे. त्यानुसार आज हिंगोली जिल्ह्यात सात दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यानुसार हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी हद्दीतील सर्व प्रकार्चाय हालचालीस (व्यक्ती,वाहन) व सर्व आस्थापना, दुकाने, खानावळ इत्यादींसाठी १ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ ते ७ मार्च २०२१ रोजी रात्री १२ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
संचारबंदी काळात दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा असणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी सुरू राहणार आहेत. बँका केवळ शासकीय कामकाजासाठी सुरू असतील. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना येजा करण्यासाठी मुभा असेल, मात्र त्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे, सर्व शाळा, महाविद्यालये, मंगलकार्यालये, लॉन्स बंद असणार आहेत. औषधी दुकाने चालू ठेवण्यासाठी मुभा राहणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 27, 2021 9:46 pm