03 August 2020

News Flash

“प्रत्यक्षात देव पाहिला नाही पण उद्धव ठाकरे यांच्या रुपाने देव भेटला”

उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आणि कामकाज यांचं सर्वसामान्यांकडून कौतुक सुरु आहे

संग्रहित फोटो

राज्यात करोनाने थैमान घातलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आणि कामकाज यांचं सर्वसामान्यांकडून कौतुक सुरु आहे. अशीच भावना हिगोलीमधील एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. फक्त एका मेसेजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत केल्याने आपण भारावून गेल्याची भावना या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. आपण कधी देव पाहिला नाही पण उद्धव ठाकरे यांच्या रुपाने आपल्याला देव भेटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक रोखण्यात येत आहे. अशाच नाकाबंदीत पोलिसांनी हिंगोलीतील शेतकरी बाळू पाटील यांचा ट्रक अडवला. बाळू पाटील यांची संत्रीची फळबाग आहे. बाळू पाटील यांना आपल्या शेतातील नऊ टन संत्री बंगळुरुला पाठवायचा होता. परंतू करोनामुळे जिल्ह्यांच्या सीमा सील असल्याने ट्रक अडवण्यात आला. पोलिसांच्या भीतीपोटी चालकानेही पळ काढला. यानंतर बाळू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मेसेज केला आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली.

आणखी वाचा- ट्रक अडवल्यानंतर शेतकऱ्याने केला थेट उद्धव ठाकरेंना मेसेज अन्….

महत्त्वाचं म्हणजे करोनामुळे सध्या व्यस्त असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तात्काळ या मेसेजची दखल घेतली. त्यांनी लगेच परभणीचे पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना फोन केला आणि शेतकऱ्यांची अडवणूक करुन नका असं सांगत ट्रक सोडण्याचा आदेश दिला. यानंतर बाळू पाटील यांचा ट्रक बंगळुरुच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला.

आणखी वाचा- “कोणी विचारलं तर अजित पवारचा फोन आलता सांग”… क्लिप व्हायरल

बाळू पाटील हे शिवसैनिक आहेत. पण त्यांनी आपल्या मेसेजमध्ये कुठेही आपण शिवसैनिक असल्याचा उल्लेख केला नव्हता. तरीही उद्धव ठाकरे यांनी तात्काल मदत केली याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने आपल्याला देव भेटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 3:47 pm

Web Title: coronavirus shivsena cm uddhav thackeray being praised by people sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 ट्रक अडवल्यानंतर शेतकऱ्याने केला थेट उद्धव ठाकरेंना मेसेज अन्….
2 करोनाशी लढणाऱ्या आरोग्य विभागाचे ६२ कोटी देण्यास वित्त विभागाची टाळाटाळ!
3 करोनाला हरवणारच! पाच दिवस उपाशी असलेल्या आदिवासी कुटुंबाचा निर्धार
Just Now!
X