करोनाचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा रविवारी केली. तसंच गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं सागत घरुन काम करा असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही लोक मोठ्या प्रमाणात घऱाबाहेर पडत असून रस्त्यांवर काही ठिकाणी वाहनांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका असं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका”.

दुसरीकडे करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक परिस्थिती गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- सरकारचा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार – राजेश टोपे

जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोक ऐकत नसल्याने संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- Coronavirus: “उद्धव ठाकरेजी लोक गंभीर नाहीत, लॉकडाउनने भागेल असे वाटत नाही; संचारबंदी लागू करा”

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “परिस्थिती गंभीर आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही”. पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी रस्त्यांवरील वाहतुकीचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की. “तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत. संकट किती भयंकर आहे याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउन ने भागेल असे वाटत नाही. संचारबंदी लागू करा”.