संपूर्ण देशामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी रात्री देशातील जनतेशी संवाद साधताना केलं आहे. त्यामळेच सामान्यांपासून ते अनेक बडी नेतेमंडळी, खेळाडू, कलाकारही घरीच आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या मुंबईतील घरामध्ये कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवणाऱ्या शरद पवारांचा व्हिडिओ त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच पोस्ट केला आहे. ‘बाबांसोबत बुद्धीबळाचा डाव खेळणं सोपं नसतं,’ अशी कॅप्शन या व्हिडिओ सुळे यांन दिली आहे.

राजकारणातील दिग्गज नेत्यापैकी एक मानले जाणारे शरद पवार या व्हिडिओमध्ये बुद्धीबळ खेळताना दिसत आहे. सुळे यांनी इन्स्ताग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पवारांची नात म्हणजेच रेवती हे बुद्धीबळ खेळताना दिसत आहेत. “करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आम्ही सर्वजण घरात आहोत.आम्ही दुपारी बुद्धिबळाचा डाव मांडला.थोड्या वेळातच बाबांनी आम्हा मायलेकींना हरवलं,” असं सुप्रिया यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पवार कुटुंब घरी एकत्र काय करत आहे याची माहितीही सुप्रिया यांनी या कॅप्शनमध्ये दिली. “आम्ही पुस्तकं वाचतोय,कुटुंबासोबत वेळ घालवतोय,” असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी इतरांना तुम्हीह घरीच थांबा सुरक्षित राहा असा सल्लाही सुप्रिया यांनी दिला आहे.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज
Shikhar Virat Meet Video
IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर विराटने नाराज शिखरला मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल

दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. “करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बाहेर पडू नका. मी देखील घरातच बसलो आहे, घरात बसून मी वाचन करतो आहे आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतो आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या,” असं पवार यांनी म्हटलं होतं. अत्यंत महत्त्वाची गरज असल्याशिवाय बाहेर पडू नका. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करा असंही आवाहन शरद पवार यांनी केलं होतं.