25 February 2021

News Flash

Coronavirus : साताऱ्यात पहिला बळी

कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा पहाटे मृत्यू

संग्रहित छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात वाढतच आहे. करोनाबाधितांसह करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. सातारामध्ये आज पहाटे करोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील हा पहिला बळी ठरला आहे.

कॅलिफोर्नियावरुन आलेल्या या 63 वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे सातारा येथे मृत्यू झाला. 14 दिवसांपूर्वी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याच रुग्णाचे कालच्या फेर तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दुसऱ्या चाचणीसाठी रुग्णांचे नमुने तापसणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. दुसरा नकारात्मक अहवाल आल्यावर त्यांना आज किंवा पुढील दोन दिवसात घरी सोडण्यात येणार होते.मात्र, त्यांचा आज सकाळी करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना पॉझिटिव्हचे चार रुग्ण सध्या साताऱ्यात आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 11:44 am

Web Title: coronavirus the first death in satara msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार
2 “प्राण्यांनाही दिवे पोहोचविले होते का?; जंगल, दऱ्या खोऱ्यात, पर्वत रांगांमध्येही दिवे लागले”
3 मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जिवंत काकीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं पण…
Just Now!
X