News Flash

Coronavirus: राज्यपालांचाही मदतीचा हात; एक दिवसाचं वेतन सहाय्यता निधीला देणार

राजभवनातील सर्व कर्मचारीही एक दिवसाचे वेतन देणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

राज्यातील करोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांनी स्वतः एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही असाच निर्णय घेत पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनेही गुरुवारी देशातील दारिद्ररेषेखालील जनतेच्या मदतीसाठी १.७० लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. यामध्ये पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त ५ किलो गहू किंवा तांदूळ तसेच १ किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच १५ रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी सरकार रक्कम भरणार आहे.

त्याचबरोबर करोनाशी सर्वात पुढे लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी ५० लाखांचे विमा कवच जाहीर करण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी महिला लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडरही देण्यात येणार आहेत. तसंच महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला ५०० रूपये सरकारकडून भरण्यात येणार आहेत. यामुळे २० कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 9:47 pm

Web Title: coronavirus the governors helping hand will pay one day salary with employees of raj bhavan aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: राज्यातील ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश
2 “भीम जयंती करोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू”
3 Coronavirus: राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार