News Flash

Coronavirus : पालघर जिल्ह्यातील करोना बाधित रुग्ण संख्या दहावर

आजवर जिल्ह्यातून 97 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

संग्रहित छायाचित्र

पालघर जिल्ह्यामध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दहावर पोहोचली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 41 रुग्णांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यांचे अहवाल यायचे आहेत. त्यापैकी 24 संशयित रुग्ण हे वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून16 संशयीत पालघर तालुक्यातील आहे.

पालघर जिल्ह्यात लक्षणे आढळलेल्या २३ संशयितांचे व  प्रवास इतिहास नसलेले मात्र तीव्र श्वसन विकार असलेल्या 29 रुग्णांचे घशाचे नमुने आजवर तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचबरोबरीने जोखीम असलेल्या व्यक्तींच्या निकट सहवासात इतर ४५ रुग्णांचे असे एकंदरीत 97 जणांचे नमुने आजवर जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 46 संशयित रुग्णांचे अहवाल नकारात्मक (निगेटिव) आले असून 10 व्यक्तींना करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील 41 संशयित रुग्णांचा अहवाल अप्राप्त असून संसर्ग झालेल्यापैकी पालघर तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू 31 मार्च रोजी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 7:22 pm

Web Title: coronavirus the number of corona affected patients in palghar district reaches ten msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या ३३५, मुंबईत १४ तर बुलढाण्यात १ रुग्ण
2 “समाजाच्या सेवेसाठी तुमचं शौर्य अतुलनीय”, राजेश टोपेंचं डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र
3 Coronavirus : अलिबागमध्ये सुरू आहे व्हिडिओद्वारे दूरस्थ योगवर्ग
Just Now!
X