मुंबईपाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे चोवीस तासात आणखी तीन बळी गेले आहेत. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या करोनाबाधित ६० वर्षीय महिलेचा आणि ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर ६९ वर्षीय करोनाबाधित वृद्ध महिलेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ससून रुग्णालयात दाखल असलेल्या या दोन्हीही रुग्णांची करोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यांपैकी ६० वर्षीय महिलेवर यापूर्वी नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी तिची चाचणी केली असताना ती निगेटिव्ह आल्याने तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने तिला (काल) शनिवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. तसेच मृत्यूपूर्वी या महिलाच्या घशातील द्रवाचे (स्वॅब) नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

तसेच एका ४८ वर्षीय पुरुषाचा देखील ससूनमध्ये मृत्यू झाला असून त्याच्या स्वॅब चाचणीचा अहवाल काल (शनिवारी) रात्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या अहवालात संबंधित व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी दोन मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर दुपारच्या सुमारास ६९ वर्षीय करोनाबाधित ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या महिलेला पित्ताशयासंबंधी आजार असल्याचे समोर आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus the third victim of corona in pune 60 year old woman dies in sassoon hospital aau 85 svk
First published on: 05-04-2020 at 11:08 IST