एखाद्याचा वाढदिवस साजरा करायचे म्हटले की मोठा गाजावाजा, बॅनर, हारतुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव असे एकंदरीत चित्र असते. या सगळ्या प्रकाराला छेद देऊन उस्मानाबादमध्ये तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब काळे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करुन एक आदर्श निर्माण केला आहे.

सध्याच्या करोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग संकटाच्या खाईत असताना आपला वाढदिवस या परिस्थितीला साजेसा आणि अविस्मरणीय ठरेल अशाच पद्धतीने साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.  करोनामुक्तीसाठी एक पाऊल म्हणून भाऊसाहेब काळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी स्वखर्चाने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी केली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला