News Flash

सोलापुरात चिंता वाढवणारी परिस्थिती; एकाच दिवशी नऊ जणांचा मृत्यू

६८० रूग्णांवर उपचार सुरू

प्रातिनिधीक छायाचित्र

सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून आज एकाच दिवशी करोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ५० नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मृतांचा आकडा १४३ आणि रूग्णसंख्या १,६६२ पर्यंत वाढली आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर करोनाचे भयसंकट आणखी वाढू लागल्यामुळे सोलापूरकरांची चिंता कायम आहे.

आज सोलापूर शहरात करोना बाधित ४३ रूग्ण सापडले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे ग्रामीण भागात तिघांचा मृत्यू झाला. तसेच सात नवे रूग्ण आढळून आले. सोलापुरात पहिला रूग्ण १२ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर दोन महिन्यात करोनाचे संकट वरचेवर अधिकच भयावह होऊ लागले आहे. सध्या शहरात ६०८, तर ग्रामीण भागात ७२ असे मिळून एकूण ६८० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८३५ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आज एका वयोवृद्ध माजी आमदारालाही करोनाने बाधित केल्यामुळे त्यास एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर महापालिकेतील आणखी दोन वरिष्ठ अधिकारीही करोनाबाधित झाले आहेत. महापौर श्रीकांचना यन्नम व त्यांच्या पती आणि मुलासह पालिकेतील पाच अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती. यात महापौर यन्नम व त्यांच्या कुटुंबीयांसह काही अधिकारी व कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ३ हजारपेक्षा जास्त रुग्ण

राज्यात मागील तीन दिवसांपासून २४ तासांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे. आज (१३ जून) सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजारांपेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आढळून आले. ३,४२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं असून, ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १,५५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५१ हजार ३७९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४९ हजार ३४६ करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता १ लाख ४ हजार ५६८ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 9:19 pm

Web Title: coronavirus update nine petient died in solapur bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सर्वोपचार रुग्णालयात करोना रुग्णांच्या जीवाशी खेळ , वंचित बहुजन आघाडीचा आरोप
2 अकोल्यात करोना रुग्णांचा मृत्यूदर ४.५६ टक्के; महाराष्ट्राच्या तुलनेत सव्वापट अधिक
3 वाशिम जिल्ह्यात सात करोनाबाधित रुग्णांची भर
Just Now!
X